(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : धक्कादायक! जुहू बीचवर पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू
Mumbai News : मुंबईची जुहू चौपाटीवर आज दुपारी तीनच्या सुमारास चेंबूर परिसरामधील चार मुले पोहायला गेले आणि त्यातील तीन मुलं बुडाल्याचा माहिती मिळत आहेत.
मुंबई : मुंबईची (Mumbai) जुहू चौपाटीवर (Juhu Beach) आज दुपारी तीनच्या सुमारास चेंबूर परिसरामधील चार मुले पोहायला गेले आणि त्यातील तीन मुलं बुडाल्याचा माहिती मिळत आहेत. फिरण्यासाठी चार जण मित्र हे चौपाटीवर आले होते. त्यातील तिघे बुडाल्याची माहिती मिळत आहे. बिर्ला लेनच्यामागे जुहू बिच येथील ही घटना आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने तिघांचा शोध घेतला जातोय.
आनन सिंह ( 21 वर्षे), कौस्तुभ गुप्ता ( 18 वर्षे) आणि प्रथम गुप्ता ( 16 वर्षे) असे बुडालेल्या मुलांची नाव आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड, स्थानिक पोलिसांनी सर्च मोहीम (Search Opreation) राबवली, मात्र तिन्ही मुलं अजूनही सापडले नाहीत. चेंबूरची ही मुलं समुद्रात जात असताना त्या ठिकाणी तैनात असलेला लाईफ गार्डचा जवानाने त्यांना आतमध्ये जाण्यापासून मनाई करत होते. मात्र हे चारही मुले त्यांचा न एकूण समुद्राच्या लाटा मध्ये गेले अशी माहिती समोर येत आहे.
काल देखील संध्याकाळी देखील इर्ला येथील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला.त्यात आज ही घटना घडली आहे. समुद्र जीवरक्षक कुठे आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. पाण्याचा मोह न आवरल्याने पोहयला गेला आणि मृत्यू झाल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा घटनांमधून कोणताही बोध न घेत अनेकदा तरुणाई बिनधास्तपणे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही काळजी न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ त्यांच्यावर येते.
संबंधित बातम्या :