एक्स्प्लोर

Measles Disease : गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली, ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरु

Mumbai Measles Disease : गोवर गंभीर होऊ शकतो ज्यात निमोनियासारखा आजार देखील बळावत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असं कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या. 

Mumbai Measles Disease News : मुंबईत (Mumbai News) गोवरचा प्रादुर्भाव (Measles Disease) वाढताना दिसत आहे. यामध्ये काही बालकं दगावली आहेत. पण येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीवरचं गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.  मुंबईकरांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कंबर कसली आहे. ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प्स सुरु आहेत. काही प्रमाणात लसीकरणाविषयीची उदासीनता आणि विरोध देखील दिसून येतो. अशा वेळी मौलवींची मदत घेत नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे.  

या पार्श्वभूमीवर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं की, गोवरचे रुग्ण वाढत आहेत. मात्र आम्ही उपाययोजना देखील करत आहोत. गोवर रुग्णांचा आढावा घेतला असता 40-50 टक्के 1-4 वर्षातील मुलांना गोवरची लागण झाली आहे तर 4-9 वर्ष वयोगटातील 70-80 टक्के मुलांना गोवरची लागण झाली असल्याचं डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं.गोवर गंभीर होऊ शकतो ज्यात निमोनियासारखा आजार देखील बळावत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असंही त्या म्हणाल्या. 

त्यांनी म्हटलं की, संशयित रुग्णांच्या संख्येत 50 टक्के मुलांनी लस घेतलेली नाही आहे. ताप आणि पुरळ असलेल्यांना त्वरीत संपर्क करण्यास सांगितलं आहे. शिवाय उपचारासाठी अतिरिक्त वॉर्डची व्यवस्था देखील केली आहे.  शिवाजी नगर रुग्णालय किंवा शताब्दी रुग्णालय सोबतच पश्चिम उपनगरीय भागातही उपचारासाठी वॉर्डची उभारणी केली आहे. 

डॉ. गोमारे म्हणाले की,  4-9 वर्ष वयोगटातील 70-80 टक्के मुलांना गोवरची लागण झाली आहे.  मात्र काळजी करण्याची गरज नाही. कारण लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय. 15 वर्ष वयोगटातील दोन संशयित रुग्णांची नोंद झाली आहे, दोन्ही रुग्ण सध्या बरे आहेत स्थिर आहेत.  

जास्त रुग्णांची संख्या ही दाटीवाटीचा परिसर, कुटुंबातील संख्या मोठी असेल, लसीकरण झालेलं नसेल आणि संतुलित आहार नसेल तर तिथे रुग्णांची संख्या जास्त आढळत आहे.  एम-पूर्व आणि एल वॉर्डमध्ये अशी मोठी संख्या आढळून आली आहे.  अतिरिक्त लसीकरणाची सत्र वाढवण्यात आली आहे, उपाययोजना केल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

त्यांनी म्हटलं की, गोवर गंभीर होऊ शकतो ज्यात निमोनियासारखा आजार देखील बळावत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असं आवाहन देखील डॉ गोमारे यांनी केलं आहे. 

ही बातमी देखील वाचा

Measles Disease Update : काळजी घ्या! बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही आढळली गोवरची लक्षणं, दोघांची संशयित रुग्ण म्हणून नोंद

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget