एक्स्प्लोर

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना ह्रदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका धावपटूचा मृत्यू झालाय. गजानन माजलकर, असं मृत्यू झालेल्या नागरिकाचं नाव आहे.

मुंबई : मॅरेथॉनमध्ये धावताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने गजानन माजलकर या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉन ओळखली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनमध्ये यंदा पंचावन्न हजारांहून अधिकजण धावले. पण याच दरम्यान मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्याने 64 वर्षांच्या गजानन माजलकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. धावत असतानाच माजलकर खाली कोसळले, त्यांना तात्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याशिवाय अन्य सात जणांनाही धावताना हृदयाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Mumbai Marathon : महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व - देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. मुंबईतल्या गुलाबी थंडीमुळं यंदा मॅरेथॉनच्या वातावरणात मोठा उत्साह दिसून आला. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यानी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगली. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये इथिओपिआचा धावपटू डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा - हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पारुल चौधरीनं पहिला क्रमांक पटकावला. मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आली तर नाशिकच्या मोनिका आथरेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या गटचात तीर्थ पुन यानं पहिला क्रमांक पटकावला. मन सिंग दुसरा तर बिलाम्पाला तिसरा क्रमांक मिळाला. एकंदरीतचं मुंबई मॅरेथॉनमधल्या महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला. Mumbai Marathon 2020 | गुलाबी थंडी, बोचरी हवा आणि मॅरेथॉन | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
Embed widget