एक्स्प्लोर

धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या

मुंबईच्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे.

Mumbai Nalasopara Crime News  :  मुंबईच्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (24) असे या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाकूने आफताब शेख याच्यावर केले वार

नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे आफताब शेख (24) हा पत्नी शबाना शेख (22) हिच्यासोबत रहात होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे फातिमा शबानाने आपल्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (22) याने कमेंट केली होती. याच मुद्द्यावरून त्यानंतर मेहंदी याने शबानाला इंस्टाग्राम या समाज माध्यमाव अश्लील शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना शेख आणि तिचा नवरा आफताब शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून मेंहदीने चाकूने आफताब शेख याच्यावर वार केले. त्यात त्याचा जागेच मृत्यू झाला.

याप्रकरणी  नालासोपारा पोलिसांनी आरोपीला केली अटक

नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मेहंदी हसन शेख याला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती. आरोपी आणि मयत हे पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहत होते. स्टेटस ठेवण्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दळवी यांनी दिली.

पोलीस भरतीत सतत अपयश, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

पोलीस भरतीत सतत अपयश येत असल्यानं एका 26 वर्षीय तरुणीची  आत्महत्या केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रतीक्षा राणे असं तरुणीचं नाव आहे. या तरुणीनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.  

तुम्हाला जे जीवन द्यायचं होतं, मला नोकरी न लागल्यानं ते देता आलं नाही

आई बाबा मला माफ करा, तुम्हाला जे जीवन द्यायचं होतं, मला नोकरी न लागल्यानं ते देता आलं नाही, अशा आशयाची नोंद सुसाईड नोटमध्ये आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूण तरुणींमध्येही या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत प्रतीक्षा ही गेल्या काही वर्षापासून पोलीस भरतीचा सराव करत होती. पोलीस विभागात नोकरी करुन आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र प्रत्येक वेळी पोलीस भरतीत तिला अपयश येत असल्यानं या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget