(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Train: ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांनो मनस्तापासाठी तयार राहा!
मध्य रेल्वेच्या स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. त्यामुळे लोकलची वाहतूक कोलमडल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
Mumbai Local Update : गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा आणि कोपरदरम्यान पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल रखडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. त्यामुळे लोकलची वाहतूक कोलमडल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
There is a disruption in services in the down local line due to a broken Overhead Equipment (OHE) between DIVA and KOPAR at 03:10 hrs. Every effort is being made to minimize the delay. Inconvenience is deeply regretted @Central_Railway @YatriRailways
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) October 7, 2024
ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा आणि कोपरदरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतुकीच्या या खोळंब्यामुळे ण रेल्वे स्थानकादरम्या स्लो मार्गावर येणाऱ्या लोकल ट्रेन रखडल्या. बराच वेळ लोकल ट्रेन न आल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचं कामी हाती घेण्यात आलं आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सकाळची वेळ असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका
मुंबई लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कारण लाखो प्रवासी मुंबईने दररोज प्रवास करतात. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने दीड ते दोन तासांचा प्रवास करुन आपापल्या कार्यालयात कामासाठी जातात. ते दररोज लोकल ट्रेनने ये-जा करतात. मुंबईत अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे मुंबई लोकल थांबली तर लाखो प्रवासी एकाच ठिकाणी स्तब्ध होतात. लाखो नागरीक हे मुंबई लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतात. त्यामुळे मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली तर त्याचा मोठा फटका या लाखो प्रवाशांना बसतो. आजदेखील मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.
हे ही वाचा :