एक्स्प्लोर

Mumbai Local : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'गॅस अॅटक'ची योजना; गुप्तचर खात्याचा इशारा

गुप्तचर खात्याच्या या इशाऱ्यानंतर आता मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती.

मुंबई : चार दिवसांपूर्वी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये गॅस सिलेंडर सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

गुप्तचर विभागाने तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं समजतंय. या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत. 

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊतTop 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi NewsPandharpur Vitthal Rakhumai Marriage : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळाABP Majha Headlines : 12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
PM Kisan : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारनं अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद
पीएम किसान सन्मान निधीसाठी 63 हजार कोटींची तरतूद, शेतकऱ्यांच्या 6000 रुपयांचा प्रश्न मार्गी
माऊली..लग्न घटिका आली समीप, भक्त वऱ्हाडींना अक्षता वाटल्या, विठ्ठल - रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भक्तांची मांदियाळी, पहा PHOTO
माऊली..लग्न घटिका आली समीप, भक्त वऱ्हाडींना अक्षता वाटल्या, विठ्ठल - रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भक्तांची मांदियाळी, पहा PHOTO
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? 5 लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज? 
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? 5 लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज? 
Emily Willis : अवघ्या 25 वर्षीय पोर्नस्टारच्या संपूर्ण शरीरावर लकवा मारला, आयुष्यभरासाठी झाली विकलांग; कुटुबीयांचा सुद्धा गंभीर आरोप
अवघ्या 25 वर्षीय पोर्नस्टारच्या संपूर्ण शरीरावर लकवा मारला, आयुष्यभरासाठी झाली विकलांग; कुटुबीयांचा सुद्धा गंभीर आरोप
Embed widget