एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Local MegaBlock: मुंबईकरांनो, आज मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच घराबाहेर पडा!

Mumbai Local MegaBlock: आज मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर वेला

Mumbai Local MegaBlock Updates : मुंबई : मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) माटुंगा-मुलुंड मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावर (Harbour Railway) पनवेल-वाशी मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे, मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा मार्गादरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक 

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.                                                

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान मेगाब्लॉक 

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱया अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱया लोकल रद्द असणार आहेत.

पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच अनेक लोकल रद्द केल्या जाणार आहेत

दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget