एक्स्प्लोर
Advertisement
कमला मिल्स आग : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू
धैर्य आणि विश्वा हे अमेरिकेचे नागरिक होते. धैर्य काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता तर छोटा भाऊ विश्वा एक वर्षांपासून भारतात राहत होता.
मुंबई : लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. या भीषण आगीत आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
26 वर्षीय धैर्य ललानी आणि 23 वर्षीय विश्वा ललानी आपली आत्या प्रमिला केणियासोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील वन अबव्ह हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते.
रात्री 12 च्या सुमारास आग लागल्यानंतर धैर्य आणि विश्वा तर बाहेर आले, पण आत्या प्रमिला वॉशरुममध्ये अडकली. आत्या आगीत अडकल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी दोघे पुन्हा आत गेले आणि आगीच्या कचाट्यात सापडले. यानंतर तिघांचे मृतदेह वॉशरुममध्ये आढळले. तिघांच्या शरीरावर भाजल्याच्या जखमा नव्हत्या. तिघांचाही गुदमरुन मृत्यू झाला.
धैर्य आणि विश्वा हे अमेरिकेचे नागरिक होते. धैर्य काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता तर छोटा भाऊ विश्वा एक वर्षांपासून भारतात राहत होता. दुसरीकडे आत्या प्रमिलाही आधी अमेरिकेत राहत होती, पण मागील काही वर्षांपासून ती पतीसोबत भारतात राहत होती.
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
काय आहे प्रकरण?
हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.
आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर परिणाम
आगीनंतर या परिसरात असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम आणि टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनींच्या प्रसारणांवरही परिणाम झाला आहे. काही कार्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत.
मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सिग्रीड हॉस्पिटॅलिटी अॅण्ड एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
"कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
तर या आगीनंतर मुंबई महापालिकाही कामाला लागली आहे. महापालिका आता कमला मिल्स कम्पाऊंडमधील सर्व रेस्टॉरन्टची तपासणी करणार आहे. कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! मृतांची नावं : प्रमिला तेजल गांधी (वय वर्षे 36) खुशबू मेहता (वय वर्षे 28) विश्वा ललानी (वय वर्षे 23) पारुल लकडावाला (वय वर्षे 49) धैर्य ललानी (वय वर्षे 26) किंजल शहा (वय वर्षे 21) कविता धरानी (वय वर्षे 36) शेफाली जोशी यशा ठक्कर (वय वर्षे 22) सरबजीत परेला प्राची खेतानी (वय वर्षे 30) मनिषा शहा (वय वर्षे 47) प्रीती राजगीरा (वय वर्षे 41) कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' आग विझली, राजकारण पेटलं! मुंबईतल्या कम्पाऊंड मिल्स परिसरातील अग्नितांडवानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. कम्पाऊंड मिल्सच्या कमी जागेत 50 हॉटेल्सना परवानगी कशी दिली असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. तर या हॉटेल्सना मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांना परवानगी दिली, त्यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. दुसरीकडे अग्नितांडावाच्या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसने शिवसेनेला घेरण्याची तयारी केली आहे.Disturbing to know about the loss of lives in unfortunate #KamalaMills fire incident in Mumbai. My thoughts are with the families who lost their loved ones and prayers for the speedy recovery of the injured. Directed the BMC Commissioner to conduct an in-depth enquiry.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement