एक्स्प्लोर

Mumbai Housing News : मुंबईतील घरांच्या विक्रीत एप्रिल ते जूनमध्ये 8 टक्क्यांची घसरण, पुण्यात 5 टक्क्यांनी घट

Mumbai Housing News : तिमाही आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये घरांची विक्री 8 टक्क्यांनी आणि पुण्यामध्ये 5 टक्क्यांनी घसरली आहे.

मुंबई: भारतातील आठ मुख्य निवासी बाजारपेठांमध्ये एप्रिल ते जून या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घरांची विक्री ६ % ने कमी झाली असून मुंबईतील घरांच्या विक्रीत ८ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रियल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने केलेल्या तिमाही विश्लेषणात असे दिसून आले आहे. प्रॉपर्टी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर हा हाऊसिंग डॉटकॉमच्या मालकीच्या आरईए इंडियाचा एक भाग आहे. कंपनीने ‘रियल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२४’ अहवालात घरांची मागणी आणि पुरवठा यासंबंधीची तिमाही आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालात मुंबई एमएमआर, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली एनसीआर या शहरांचा समावेश आहे.     

आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत या घरांची विक्री ६ टक्क्यांनी घसरून १,१३,७६८ युनिट्सवर आली असून आधीच्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत ती १,२०,६४२ युनिट्स होती. तिमाही विक्रीत झालेली ही घट फक्त बंगळूर ३० % वाढ) आणि दिल्ली-एनसीआर (१० % वाढ) चा अपवाद वगळता देशात सर्वत्र दिसून आली. तर एप्रिल-जून तिमाहीत नवीन पुरवठा जानेवारी-मार्च कालावधीतील १,०३,०२० वरून १ टक्क्यांनी कमी होऊन १,०१,६७७ युनिट्सवर आला.   

प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “एप्रिल ते जून चा कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांमुळे घरांची मागणी माफक राहिली असली तरी मजबूत मूलभूत कारणांमुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीबाबत ग्राहकांचे विचार खूपच सकारात्मक होते. केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारे बजेट येईल ही अपेक्षा असल्याने आगामी तिमाहींमध्ये, विशेषतः सणासुदीच्या मोसमात विक्रीचे आकडे मजबूत होतील याची आम्हाला खात्री वाटते.”

मुंबई एमएमआर, पुण्यात गृहविक्रीत घट: 

तिमाही आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर)मध्ये घरांची विक्री ४१,९५४ युनिट्सवरून ८ टक्क्यांनी घसरून ३८,२६६ युनिट्सवर आली. तर पुण्यातील घरांची विक्री एप्रिल ते जून या कालावधीत ५ टक्क्यांनी घसरून २१,९२५ युनिट्सवर आली आहे, जी मागील तिमाहीत २३,११२ युनिट्स होती. अहमदाबादमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये २६ टक्क्यांनी घसरून ९,५०० युनिट्सवर आली आहे जी यावर्षी जानेवारी-मार्च दरम्यान १२,९१५ युनिट्सवर होती. बंगळुरूमध्ये मात्र १०,३८१ युनिट्सवरून विक्री ३० टक्क्यांनी वाढून १३,४९५ युनिट्स झाली. चेन्नईतील निवासी मालमत्तांची विक्री ४,४२७ युनिट्सवरून १० टक्क्यांनी घसरून ३,९८४ युनिट्सवर आली आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये विक्री १० टक्क्यांनी वाढून १०,०५८ युनिट्सवरून ११,०६५ झाली. हैदराबादमधील घरांची विक्री १४,२९८ वरून १४ टक्क्यांनी घसरून १२,२९६ युनिट्सवर आली आहे. कोलकात्यात विक्री ३,८५७ वरून १६ टक्क्यांनी घसरून ३,२६७ युनिट्सवर आली.

नवीन पुरवठ्यात अहमदाबाद, बंगळुरूमध्ये सर्वाधिक वाढ:

अहवालातील तिमाही आकडेवारीनुसार अहमदाबादमध्ये नवीन पुरवठ्यात पहिल्या तिमाहीच्या ३११६ युनिट्सच्या तुलनेत ११० टक्क्यांची वाढ झाली असून ६५३३ युनिट्सवर पोहोचली आहे. बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्येही नवीन पुरवठ्यात अनुक्रमे २६ टक्के, १७ टक्के आणि १० टक्क्यांची वाढ झाली असून युनिट्सची संख्या अनुक्रमे १२,५६४, ८०५३ आणि ४०,४६२ वर पोहोचली आहे. तर चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुण्यात नवीन पुरवठ्यात अनुक्रमे २ टक्के, ५८ टक्के, ४९ टक्के आणि ११ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून युनिट्सची संख्या अनुक्रमे ४,६३३, ६,३६५, ७५३, २२,३१४ वर आली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget