एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गृहप्रकल्पातील सुखसुविधा, सोईसुविधांसाठी महारेराचा नवा नियम, लवकरच घर खरेदीदारांची डोकेदुखी कमी होणार!

आता नव्या नियमानुसार आश्वासित केलेल्या सुखसोई, सुविधा नेमक्या कधीपर्यंत उपलब्ध होतील, त्याचा तपशील विकासकांना द्यावा लागणार आहे. यामुळे सामान्यांची डोकेदुखी कमी होणार आहे.

मुंबई : पार्किंगमधील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदीचा आदेश जारी केल्यानंतर महारेराने आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा ( Facilities), सुखसोयीतील ( Amenities) अनिश्चितता संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदर्श विक्री करारात अनुसूची दोनमध्ये आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा फक्त उल्लेख होता. आता या प्रस्तावित आदेशात दिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार यांचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नव्या नियमात नेमके काय?

प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात (Common Area), इमारतीत (Building), इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात  Common Area of the Building ) आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात ( Project Layout)  द्यायच्या तरणतलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट अशाप्रकारच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार? त्याचा आकार काय राहील? याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार असल्याचे नवीन आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे. विक्री करार करताना ( Agreement for Sale) या प्रस्तावित आदेशासोबत दिलेल्या जोडपत्राच्या मसुद्यानुसार विक्री कराराचा भाग म्हणून देणे बंधनकारक आहे. घर खरेदीदारांच्या दृष्टीने याचेही महत्त्व लक्षात घेता ही तरतूदही अपरिवर्तनीय राहणार आहे.

यापूर्वी प्रमाणित विक्री करारातील दैवी आपत्ती, दोषदायित्व कालावधी, चटई क्षेत्र, हस्तांतरण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या पार्किंग नंतर ही सहावी तरतूद अपरिवर्तनीय राहणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

अगोदर घर खरेदीदारांना यायच्या अडचणी

कुठल्याही नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या विक्री करारात प्रकल्पाचे बांधकाम, सदनिकांचा विनिर्देशांसह तपशील, आतील, बाहेरील कामे, प्रकल्प उभारणीच्या, पूर्ततेच्या टप्पेनिहाय विविध तारखा, त्यानुसार पैसे भरण्याचे वेळापत्रक, सदनिकांची किंमत, सदनिका हस्तांतरणाची तारीख, त्यास विलंब झाल्यास  प्रवर्तकाने द्यायचा दंड आणि ठरल्यानुसार पैसै भरण्यास विलंब झाल्यास घर खरेदीदाराने द्यायचे व्याज. असा सर्व बारीक सारीक तपशील विक्री करारात असतो. परंतु या करारात प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात द्यायच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार? त्याचा आकार काय राहील? याचा कुठलाही तपशील नसतो. अपवादाने असलाच तर या सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार याचा तपशील नसतो. त्यामुळे अनेकदा सदनिका नोंदणी करताना आश्वासित सुविधा, सुखसोयी राहायला गेल्यानंतर आश्वासनानुसार उपलब्ध असतातच असे नाही. 
 
येथून पुढे याबाबत घरखरेदीदारांची फसवणूक होऊ, यात प्रवर्तकाची दायित्व वाढून पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी महारेराने विक्री करारात ही बाब जोडपत्रात सर्व तपशीलासह देणे बंधनकारक केलेली आहे. ही तरतूद अपरिवर्तनीय बाब म्हणूनही प्रस्तावित केलेली आहे.

हेही वाचा :

घरासमोर 50 रोल्स रॉयस, 1000 कोटीच्या हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर, भारताचे पहिले अब्जाधीश कोण होते?

प्रमोशन झालं तरी कर्मचाऱ्यांचा खिसा रिकामाच, 'ड्राय प्रमोशन' भानगड आहे तरी काय?

'या' सहा योजनांत गुंतवणूक केल्यास महिला होतील करोडपती, भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget