एक्स्प्लोर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं धडाक्यात कमबॅक

गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले 56 वर्षीय प्रदीप शर्मा नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पोलिस सेवेत परतले. प्रदीप शर्मा ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसात रुजू झाले.

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने अटक केली. पोलिसांनी इक्बालसह तिघांच्या मुसक्या आवळल्या. या संपूर्ण घटनाक्रमात एका नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे नाव आहे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेल अर्थात खंडणीविरोधी शाखेचे प्रमुख प्रदीप शर्मा. एकेकाळी मीडियात कायम चर्चेत असलेले प्रदीप शर्मा मोठ्या काळापासून जणू अज्ञातवासातच होते. पण एक महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये खाकी वर्दीत परतलेल्या प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेकंड इनिंगची सुरुवात धडाक्यात केली. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित झाले होते. 56 वर्षीय प्रदीप शर्मा नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पोलिस सेवेत परतले. प्रदीप शर्मा ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसात रुजू झाले. इक्बाल कासकरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांकडे कामगिरी सोपवण्यात आली. रात्री नऊ ते सव्वानऊ वाजता प्रदीप शर्मा नागपाड्यात दाऊदची बहीण हसीनाच्या घरी पोहोचले आणि इक्बाल कासकरला बेड्या ठोकल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत 113 एन्काऊंटर - 1983 बॅचचे पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे. - प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त (113) एन्काऊंटरची नोंद आहे. 'अब तक 56' हा सिनेमात प्रदीप शर्मा यांच्यावर आयुष्यावर बनला होता. - शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर 'रेगे' नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ-प्रदीप शर्मा - एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलिसात रुजू झाले होते. - माहिम पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. यानंतर काही वर्षांसाठी त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये झाली होती. - प्रदीप शर्मा यांच्याकडे घाटकोपर आणि जुहू पोलिस स्टेशनचाही चार्ज होता. - असं म्हटलं जातं की, त्यावेळी घाटकोपर पोलिस स्टेशनचा चार्ज घेण्यास कोणीही सहसा तयार होत नसे. पण प्रदीप शर्मा यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारांनी त्या परिसरापासून दूर राहणंच पसंत केलं. अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस Iqbal-Kaskar-Pradeep-Sharma-1 मुंबईत प्रदीप शर्मा यांचा बोलबाला - प्रदीप शर्मा यांनी मुंबईत पाऊल ठेवलं त्यावेळी गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले होते. दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांसारखे मोठमोठे गुन्हेगार पोलिसांच्या हिट लिस्टवर होते. - इथे येताच शर्मा यांनी आपली नजर गुन्हेगारांवर वळवली. त्यांनी गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं, यानंतर मुंबईत त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. - मात्र 2008 मध्ये प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला. यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी प्रदीम शर्मांना मुंबई पोलिसातून निलंबित केलं होतं. - निलंबनाविरोधात प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादात आव्हान दिलं होतं. पण त्याचा निकाल येण्याआधीच 2010 मध्ये प्रदीप शर्मा यांना छोटा राजन टोळीतील लखन भय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अटक झाली होती. - जुलै 2013 मध्ये मुंबईतील कोर्टाने पुराव्यांअभावी त्यांची या आरोपातून सुटका केली. अखेर 17 ऑगस्ट 2017 रोजी ते ठाणे पोलिसात रुजू झाले. - प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 हून अधिक एन्काऊंटरचा रेकॉर्ड आहे, ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही समावेश आहे. जन्म आग्र्यातला, धुळ्यात शिक्षण - प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झाला होता. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळ्यात हिंदी मीडियम शाळेचे मुख्याध्यापक होते. - त्यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण धुळ्यातूनच पूर्ण केलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाची परीक्षा दिली. पास झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलिसात निवड झाली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल गँगस्टर विनोद मातकरच्या एन्काऊंटरमुळे प्रसिद्धी - क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या प्रदीप शर्मा यांनी कुख्यात गँगस्टर विनोद मातकरचा एन्काऊंटर केल्यानंतर ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले. - विनोद मातकरशिवाय प्रदीप शर्मा यांनी परवेझ सिद्दीकी, रफीक डब्बावाला, सादिक कालिया या गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला. - यानंतर मुंबईला हादरवण्याचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटर केला. - प्रदीप शर्मा यांच्यानुसार, त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या नोकरीत 112 पेक्षाही जास्त एन्काऊंटर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Torrent Power Karjat Project : कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Deshpande: कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार
कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Embed widget