एक्स्प्लोर
मुंबई विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीमध्ये, शिवसेनेकडून प्रतींची होळी
मुंबई विकास आराखड्याच्या प्रतींची होळी करत शिवसेनेने आंदोलन केलं आहे. विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीमध्ये छापल्याचा निषेध करत मुंबईतील कुर्ल्यामध्ये आराखड्याच्या प्रती जाळण्यात आल्या आहेत.
मुंबई : मुंबई विकास आराखड्याच्या प्रतींची होळी करत शिवसेनेने आंदोलन केलं आहे. विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीमध्ये छापल्याचा निषेध करत मुंबईतील कुर्ल्यामध्ये आराखड्याच्या प्रती जाळण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीत छापून मराठीचा अपमान केला आहे. त्यामुळे सरकारने त्या मराठीत छापाव्या अशी मागणीही शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली आहे.
मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये राज्य सरकारने अनेक बदल केले आहेत. तसंच हा आराखडा मराठीऐवजी इंग्रजीत छापून सरकारने आपल्या भाषेचा अपमान केला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. विकास आराखड्याच्या इंग्रजी प्रतींना आमचा विरोध आहे त्यामुळे सरकारने त्या मराठीत छापाव्य़ा अशी मागणीही करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनीसुद्धा या विरोधात आंदोलन करा असे आदेश दिले होते.
मुंबईचा रखडलेला विकास आराखडा 26 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आला. शहरात परवडणाऱ्या घरासाठी आतापर्यंतची सर्वाधिक जागा खुली करण्यात येणार आहे. तर 80 लाख जणांना रोजगाराच्या संधीचं उद्दिष्ट्य ठेवून कमर्शियल एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईची आर्थिक राजधानी असलेली ओळख अबाधित राहणार असली तरी शहरातली गर्दी दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत होती.
संबंधित बातम्या :
मुंबईच्या वादग्रस्त डीपीमुळे मैदानं-मोकळ्या जागांचा बळी
मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र पार्किंग प्राधिकरणाचा प्रस्ताव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement