(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर, 2526 सक्रिय रुग्ण
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी सतरा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 218 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2526 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2355 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.029% टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2022
31st May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 506
Discharged Pts. (24 hrs) - 218
Total Recovered Pts. - 10,43,710
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 2526
Doubling Rate - 2355 Days
Growth Rate (24th May- 30th May)- 0.029%#NaToCorona
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2526 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 297 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 413 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 83, पालघर 29, रत्नागिरी 15 आणि नागपूरमध्ये 21 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात मंगळवारी 711 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही.कोरोना संपलाय, अशी आशा बाळगत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या