Mumbai boys drowned in sea : मुंबईत धुळवडीच्या सणाला गालबोट, माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु
Mahim, Mumbai : माहिम येथे समुद्रकिनारी फिरायला आलेली मुलं 5 मुलं बुडाली आहेत. यातील 4 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
Mahim, Mumbai : माहिम येथे समुद्रकिनारी फिरायला आलेली मुलं 5 मुलं बुडाली आहेत. यातील 4 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. 2 लोक सुखरुप आहेत तर दोघांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक तरुण अद्याप मिसिंग आहे. त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव त्याचा शोध सुरु आहे. हर्ष किंजले असे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कॉलेजात शिकणारे मित्र फिरण्यासाठी आले होते समुद्रकिनारी
कॉलेजात शिकणारे सर्व मुलं समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडलाय. एकाला शोधण्यात यश, तर दुसऱ्याचा अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस घेत आहेत . शोध घेतलेल्या एका मुलाला जवळच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक,सागरी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित आहेत.
वैनगंगा नदीतही तरुण बुडाला
गावातील तरुणांनी सकाळी रंगपंचमिनिमित्त धुळवड साजरी केली. त्यानंतर दुपारी गावालगतच्या वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. यावेळी खोल पाण्याचा अंदाज नं आल्यानं एका तरुणाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील दोनाड इथं घडली. नितेश तेजराम बरडे (25) असं मृतकाचं नावं असून तो लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथला रहिवासी होता. दरम्यान, नदीपात्रात डोंगा हाकत असलेल्या एका नावाड्यानं घटनास्थळी पोहोचत युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Mahayuti Seat Sharing : महायुतीचे 48 पैकी 46 मतदारसंघातील जागा वाटप निश्चित, फक्त 2 जागांमुळे तिढा, कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?