एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांची परीक्षा रद्द
'या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे सेटही मी मुख्यमंत्र्यांना दिले. ते बघून मुख्यमंत्री हसले. त्यांनी आयुक्तांना ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश दिले' अशी माहिती भाई गिरकरांनी दिली.

मुंबई : मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार भाई गिरकर यांनी दिली. दहावी पास पात्रता असलेल्या सफाई कामगारांच्या भरती परीक्षेत कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. भाई गिरकर यांनी विधान परिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले होते. सफाई कामगारांच्या परीक्षेला स्थगिती द्यावी, असं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. ऑनलाईन परीक्षा घेतल्यानं अनेकांना त्याचा मोठा फटका बसल्याचंही गिरकर म्हणाले होते. 'या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे सेटही मी मुख्यमंत्र्यांना दिले. ते बघून मुख्यमंत्री हसले. त्यांनी आयुक्तांना ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश दिले' अशी माहिती गिरकरांनी दिली. सफाई कामगार भरतीसाठी विचारलेले भन्नाट प्रश्न 1. भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण? 2. 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? 3. फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात? 4. गायनेशियम म्हणजे काय? 5. लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते? 6. सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ? 7. निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी 12 महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये 12:11 या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती. 8. 72 कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी 6 सेकंदात 1 पोल ओलांडते. ही आगगाडी 480 मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?
संबंधित बातमी
सफाई कर्मचाऱ्यांची घेतलेली परीक्षा रद्द करा: आमदार गिरकर
सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? BMC सफाई कामगार भरतीत भन्नाट प्रश्न
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























