एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत वांद्र्याच्या झोपडपट्टीची आग नियंत्रणात
आज सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली.
मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिममधल्या नागरदास रोडजवळच्या निर्मल झोपडपट्टीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. आगीत 60 ते 70 झोपड्या जळून खाक झाल्या असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निर्मल झोपडपट्टीत आज सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली. आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. लेव्हल 4 ची आग असल्याने अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुरु आहे.
लाकडी आणि बांबूच्या झोपड्या असल्याने आग वेगाने पसरली. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या झोपडपट्टीला लागूनच फर्निचरची दुकानं आहेत. शिवाय जवळच लकी हॉटेल आणि मशिदही आहे. त्यामुळे तिथे आग पसरु नये याची काळजी घेतली जात होती.
निर्मल झोपडपट्टीमध्ये हजारो लोक राहतात. तसंच या झोपडपट्टीत अनेक लहान उद्योग चालवले जातात. आगीत 60 ते 70 झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीही इथे आगीची घटना घडली होती.
अतिशय अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पुलावर उभं राहून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. तसंच स्थानिकही आपापल्या परीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. तसंच आग नेमकी कशामुळे लागली की लावली गेली, याचीही चौकशी होईल, असं महाडेश्वर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement