एक्स्प्लोर
किंग्ज सर्कल पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवला
किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखली पहाटे एक कंटेनर अडकला.

मुंबई: किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली अडकलेला कंटनेर जवळपास 6 तासांनी हटवण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली भलामोठा कंटेनर अडकला. अवजड वाहनांना या रस्त्यावरुन परवानगी नाही. उंचीची मर्यादा असूनही चालकाने कंटेनर तसाच पुढे नेल्याने, तो ब्रिजमध्ये अडकला. त्यामुळे या मार्गावर सकाळी सकाळी रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी पहाटेपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखली पहाटे एक कंटेनर अडकला होता. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं कंटेनर हटविण्याचं काम सुरु होतं. मात्र तोपर्यंत ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली.
यामुळे ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या कंटेनरचा चालक संदीप पांडुरंग फापडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून. त्याला ताब्यात घेतलं आहे. गेल्या आठ दिवसात ही दुसरी अपघाताची ही घटना आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखली पहाटे एक कंटेनर अडकला होता. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं कंटेनर हटविण्याचं काम सुरु होतं. मात्र तोपर्यंत ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली.
यामुळे ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या कंटेनरचा चालक संदीप पांडुरंग फापडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून. त्याला ताब्यात घेतलं आहे. गेल्या आठ दिवसात ही दुसरी अपघाताची ही घटना आहे. Mumbai: A container truck met with an accident at King Circle railway bridge in the early morning hours. pic.twitter.com/vJ2r6DdYaa
— ANI (@ANI) March 6, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























