एक्स्प्लोर
मुंबईच्या झवेरी बाझारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 4 मृत्यूमुखी
अतिशय जुन्या असलेल्या या इमारतीचे म्हाडामार्फत पुनर्बांधणीचे कामही सुरु होतं.
मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्वात जुना परिसर म्हणून झवेरी बाजारची ओळख आहे.
चिप्पी नावाच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब काल (15 डिसेंबर) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. अतिशय जुन्या असलेल्या या इमारतीचे म्हाडामार्फत पुनर्बांधणीचे कामही सुरु होतं.
दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होतं. परंतु चिंचोगी गल्ली असल्याने आणि कमी जागा असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.
फिरोज खान (वय 23 वर्ष), सपाई शेख (वय 24 वर्ष), मोहम्मद शेख (वय 19 वर्ष) आणि बरकतुल्ला खान (वय 50 वर्ष) अशी दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement