MPSC कडून उमेदवारांच्या अडचणी निवारणासाठी टोल फ्री सुविधा सुरू होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांच्या अडचणी-शंका निवारणासाठी खास सुविधा.उद्यापासून 'एमपीएससी' उमेदवारांसाठी टोल फ्री सुविधा सुरू होणार आहे.
मुंबई : राज्यभरातून दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. त्यामुळे अशा स्पर्धापरीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी खास सुविधा उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.
उद्यापासून एमपीएससीने उमेदवारांसाठी टोल फ्री क्रमांक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी, परीक्षेसंदर्भात शंका व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडवण्याचं काम या टोल फ्री सुविधेमार्फत केले जाणार आहे. यासाठी एमपीएससीने उमेदवारांना 1800-1234-275 आणि 1800-2673-889 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवाराच्या प्रत्येक अडचणीचे शंकाचे निवारण उद्यापासून रोज सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवार, रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केले जाणार आहे. टोल फ्री क्रमांक व्यतिरिक्त उमेदवारांना support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना किंवा अर्ज भरताना व इतर तांत्रिक अडचणीमुळे संपर्क नेमका कसा करावा? व तात्काळ अडचण कशी सोडविता येईल? असा प्रश्न पडायचा. शिवाय, अनेकदा संपर्क करून सुद्धा शंका निवारण होत नव्हते. त्यामुळे या सुविधेमुळे उमेदवारांना आपले परिक्षेबाबतच्या अडचणी, शंका सोडविण्याचे काम 'एमपीएससी'कडून केले जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI