एक्स्प्लोर

उल्हासनदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचे बेमुदत धरणे आंदोलन, तर नदी बचाव समिती पर्यावरणमंत्र्यांना दोन हजार पत्र पाठवणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही नदी पात्रातील जलपर्णी फोफावली असून सामाजिक संघटनांनी नदीपात्र स्वच्छतेचा मुद्दा प्रकाश झोतात आणला आहे. यानंतर पर्यावरण प्रेमी देखील आक्रमक बनले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदी पात्रात विना प्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी, उगवलेली जलपर्णी यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण प्रेमींकडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन, पत्र व्यवहाराच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आश्वासनांपलीकडे उल्हास नदीच्या पदरी काहीच पडलेले दिसत नाही.

गेल्या 10 दिवसांपासून मी कल्याणकर संस्थेतर्फे उल्हास नदी प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे तर उल्हास नदी बचाव कृती समितीतर्फे देखील सरकारला जागं करण्यासाठी नागरिकांना थेट पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून नदी वाचवण्याचे साकडे घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल 2 हजारहून अधिक पत्र पर्यावरण मंत्र्यांना पाठवण्यात आली आहेत. निदान आता तरी सरकारला या गंभीर प्रश्नी जाग येईल का? सरकार आता तरी ठोस पावले उचलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी पात्रात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील घरगुती सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीपात्रात सोडले जाऊ नये असे निर्देश खाडी प्रदूषणाबाबत दाखल असलेल्या याचिकेदरम्यान हरित लवादासह सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र तरीही या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. उलट नदी पात्रात सोडले जाणारे सांडपाणी दिवसागणिक वाढत आहे. पावसाळा संपताच नदीचा प्रवाह मंद झाला आणि नदी पात्रातील जलपर्णीने डोके वर काढले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नदी पात्रातील जलपर्णी फोफावली असून सामाजिक संघटनांनी नदीपात्र स्वच्छतेचा मुद्दा प्रकाश झोतात आणला आहे. यानंतर पर्यावरण प्रेमी देखील आक्रमक बनले आहेत. पर्यावरणप्रेमी बरोबरच नदी बचाव समितीच्या वतीने नदी पात्राचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारी ढीगभर पत्रे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धाडण्यात आली आहेत. आतापर्यत 2000 पत्रे पाठवण्यात आली असून पुढील काळात स्वच्छता होत नाही तोपर्यत आणखी पत्रे धाडली जाणार असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

दरम्यान या प्रश्नावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना खासदार शिंदे यांनी उल्हास नदीत सोडल्या जाणऱ्या 6 नाल्यांवर एसटीपी प्लांटचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र तरीही सांडपाणी नदी पात्रात सोडले जात असून यापुढे प्रक्रिया न झालेले सांडपाणी नदीत जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मोहने येथील जल उद्चन केंद्र नदीच्या वरच्या प्रवाहावर स्थलांतरित करण्याबाबत 35 कोटीचा डीपीआर प्रशासनाने तयार केले असून त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale on Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
Central Railway : मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ
हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Mangalwedha Reel Star Ends Life: प्रसिद्ध रिलस्टारचं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या किचनमध्ये गळ्याला दोर लावला अन्... मंगळवेढ्यात खळबळ
प्रसिद्ध रिलस्टारचं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या किचनमध्ये गळ्याला दोर लावला अन्... मंगळवेढ्यात खळबळ
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Ramdas Athawale on Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
Embed widget