एक्स्प्लोर
मुंबईत वर्षभरात विनयभंग, बलात्काराच्या घटनेत 250 टक्क्याने वाढ

मुंबई: मुंबईतील पोलीस विभाग आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासंदर्भातील प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आहे. 2015 ते 2016 या गेल्या एक वर्षांत बलात्कार आणि विनयभंगात 250 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. 2013 ते 2016च्या काळात स्त्रिया आणि मुलांमधील असुरक्षिततेची भावना 22 टक्क्यांवरुन 33 टक्क्यांवर गेल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य परिसरात सर्वाधिक 9286 गुन्हे घडले असून स्थानिक आमदारानं गुन्ह्यांच्या संदर्भात केवळ 60 प्रश्न विचारल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा























