Raj Thackeray : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'; राज ठाकरेंची 'ठाकरे सरकार'वर टीका, योगी सरकारचं कौतुक
MNS Raj Thackeray Tweet On Yogi Sarkar :उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं (Yogi Sarkar) धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.
MNS Raj Thackeray Tweet On Yogi Sarkar : धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं (Yogi Sarkar) धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
राज ठाकरेंनी हे ट्वीट टाकताना #Azaan आणि #Loudspeakers हे दोन हॅशटॅग दिले आहेत. सोबतच अभिनंदनाचं पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला तीन मे चा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर राज्यासह देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे.
उत्तर प्रदेशात मात्र योगींनी काय निर्णय घेतलाय...
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशानंतर मंदीर असो किंवा मस्जिद त्यावर असलेले अवौध लाउडस्पीकर काढण्याचं काम सुरू केलं आहे. स्वत: ज्या गोरखनाथ मंदिरचे ते महंत आहेत. त्या मंदिरातले आणि जवळच असलेल्या मस्जिदचे लाउडस्पीकरचा आवाज मर्यादित केला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लाऊडस्पीकरवरून होणारं राजकारण पाहता यूपीत अनेक लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात उचलेलं पाऊल कौतुकास्पद मानलं जात आहे. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले असल्याची माहिती आहे.