एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृह सुरू करण्यासाठी मनसेचं अनोखं आंदोलन
डोंबिवलीतलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ त्यात नाटकं बघण्याची इच्छा असलेल्या डोंबिवलीकर नाट्यरसिकांचा मोठा हिरमोड होत आहे.
कल्याण : मनसे आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. डोंबिवलीतलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेनं असंच अनोखं आंदोलन केलं. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज चक्क नाटकातली पात्रं अवतरली. डोंबिवलीतलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ त्यात नाटकं बघण्याची इच्छा असलेल्या डोंबिवलीकर नाट्यरसिकांचा मोठा हिरमोड होत आहे. त्यामुळे मनसेनं चक्क वेगवेगळ्या नाटकांमधली पात्रं केडीएमसीत आणली.
यामध्ये अलबत्त्या गलबत्त्या, तो मी नव्हेच, वस्त्रहरण, नटसम्राट, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर अशा नाटक आणि चित्रपटातल्या पात्रांचा समावेश होता. या सर्वांनी केडीएमसी उपायुक्तांना निवेदन देत नाट्यगृह लवकर सुरू करण्याची मागणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement