एक्स्प्लोर
LIVE : काँग्रेस कार्यालय तोडफोड: संदीप देशपांडेंना अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली.

मुंबई: काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी संदीप देशपांडे यांना अटक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं. फेरीवाल्याच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद उफाळला आहे. https://twitter.com/abpmajhatv/status/936529709235453957
LIVE UPDATE
- मनसेचं काय चुकलं? शिवाय बदल्याची भाषा करणारी मुंबई काँग्रेस महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार विसरली काय? तसंच मनसेविरुद्ध बांगड्या दाखवणं हा महिलांचा अपमान नाही का? - नितेश राणे
- काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, गुरुदास कामत यांची मागणी
- हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, 6 जणांना ताब्यात घेतलं आहे, कडक कायदेशीर कारवाई करु : मुंबई पोलीस
- मनसेकडून मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, सीसीटीव्ही फुटेज समोर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























