एक्स्प्लोर

MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष

MMRDA Monsoon Preparation : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सूनदरम्यान येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणार येणार आहे. 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सूनच्या पार्श्वभुमीवर आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सदर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे.  या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरसन आणि निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था इत्यादी विविध आपत्ती नियंत्रण संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे.  एमएमआरडीएने स्थापन केलेला नियंत्रण कक्ष ०१ जून, २०२४ ते १५ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत कार्यरत असणार असून नागरीक  ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६,  ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) या हेल्पलाईन क्रमांकांच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. 

प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी करण्यासाठी एमएमआरडीएने आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.  झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे अशा विविध बाबींवर नागरिकांना नियंत्रण कक्षाची मदत घेता येणार आहे. नियंत्रण कक्षाचे कर्मचारी २४ तास आणि तीन शिफ्टमध्ये  कार्यरत असणार आहेत.  

असे असेल आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे काम एमएमआरडीएच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या माध्यमातून नागरिकांकडून प्राप्त तक्रार नोंदविणे, तसेच ती संबंधित अभियंता/अधिकारी/कर्मचारी यांकडे वर्ग करण्यात येते. तक्रार एमएमआरडीएसंबंधित नसल्यास ती संबंधित प्राधिकरण, महानगर पालिका आणि विविध संस्थांना कळविण्यात येते. त्यासोबतच सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबतचे अभिप्राय तक्रारकरणाऱ्या नागरिकांस कळविण्यात येते. 

सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो रेल प्रकल्प, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार, ऐरोली-काटाई नाका बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्यासोबतच एमयुआयपी आणि ओएआरडीएस अंतर्गत विविध रस्ते आणि पुलांची कामे यासारखे प्रकल्प राबवत आहे.   

मान्सून दरम्यान मेट्रो प्रकल्पस्थळी खबरदारी घेणार एमएमआरडीएची सुमारे ३०० जणांची टीम

मान्सून दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी प्रत्येक मेट्रो प्रकल्प स्थळी १ अभियंता आणि १० मजुरांची टीम (आपत्कालीन दल )तैनात असेल. विविध मेट्रो प्रकल्पस्थळी अशा एकूण १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत. प्रकल्पस्थळी रात्रीच्या वेळी एमएमआरडीए/ सल्लागार/कंत्राटदारांकडून वेळोवेळी तपासणी करण्याचे नियोजित केले आहे. त्यासोबतच एकूण १८ आपत्कालिन केंद्र, १८ देखभाल वाहने आणि १७ ॲम्ब्युलन्सची तरतूद करण्यात आली असून ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे. प्रकल्पलगतच्या भागात पाण्याचा निचरा योग्य रितीने करण्यासाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे सुमारे १३१ पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. 

मेट्रो प्रकल्प स्थळालगत वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी शक्य असेल त्या भागातील बॅरिकेड्स आत खेचण्यात आले असून कामे पूर्ण झालेल्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. तसेच भविष्यात देखील काम पूर्ण झालेल्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात येणार आहेत. या सोबतच प्रकल्पस्थळावरून मातीचा ढीग काढणे, खराब झालेले नाले आणि दुभाजक दुरूस्त करणे, पाईलिंग आणि पाईल कॅपची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित असून आवश्वकतेनुसार महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कामे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच विद्युत उपकरणांमुळे उद्भवणारे धोके टाळण्यासाठी विद्युत उपकरणांची आवश्यक चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

अटल सेतू झाला मान्सून रेडी

भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू रोज हजारो नागरिकांचा ०१ तासाहून अधिक प्रवासाचा वेळ वाचवत आहे. हा पूल मान्सून दरम्यान देखील अविरत सुरू रहावा यासाठी सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे. सागरी सेतुवर पाणी साचण्यास प्रतिबंध करण्यासाठी ड्रेनेज सिस्टमची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आलेली असून पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करण्यात आलेले आहेत. अटल सेतू प्रकल्पासाठी १ अभियंता आणि १० मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन करण्यात आलेले आहे. प्रकल्पासंबंधित तक्रार नोंदणीसाठी आणि विविध विभागांशी समन्वय साधण्यासाठी २४ तास आपत्ती नियंत्रण कक्षाची तरतूद देखील करण्यात आली आहे. अटल सेतूवरील गाड्यांच्या माध्यमातून होणारी तेल गळती किंवा इतर निसरड्या पदार्थांसारख्या संभाव्य स्लिप आणि ट्रिप धोक्यांचे निवारण करण्यासाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीम आणि अग्नी शमन वाहन (FRV)  टीम द्वारे पूलावर वेळोवेळी गस्त घालण्यात येणार आहे. जेणेकरून अपघातांना आळा घालता येईल. पावसाळ्याच्या कालावधीत, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी आणि प्रकल्पामध्ये अतिरिक्त व्हिज्युअल तपासणी करण्यात येणार आहे.  

अटल सेतूसाठी आपत्कालीन टोल फ्री क्रमांक- 1800 203 1818

नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी सूर्या प्रकल्प सज्ज

वसई विरारच्या नागरिकांना सूर्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ आणि पिण्यायोग्य अशा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणी मान्सून दरम्यान देखील नागरिकांना पुरवण्यासाठी सूर्या प्रकल्पामध्ये विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. कावडास येथील उदंचन केंद्रामध्ये पूरस्थितीनिर्माण झाल्यास पाणी ओढणाऱ्या पंपांना कोणतेही नुकसान होऊनये यासाठी ते पुर रेषेच्या पातळीपासून ०२ मीटर उंच बसवण्यात आलेली आहेत. तसेच उदंचन केंद्रातील साठलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त क्षमतेचे उपकरण उपलब्ध करण्यात आलेले आहेत. 

त्यासोबतच पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रावर आयएस १०५०० आणि सीपीएचईईओ मानांकनानुसार अद्ययावत अशी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेली आहे. जिच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता स्थिर राखण्याबाबत उपाय योजना करण्यात येणार आहेत. मान्सून दरम्यान जलवाहिनी व उपकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंत्राटदारामार्फत गस्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

काशिदकोपर येथील टेकडीवर उभारण्यात आलेल्या जलाशय व टेकडीच्या संरक्षणाकरीता उतार संरक्षण उपाययोजना (Slope protection measures) करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर जलवाहिनीलगत असलेल्या भूस्खलन प्रवण क्षेत्रांकरीता संरक्षण भिंत बांधण्यात आल्या आहेत. तसेच प्रकल्पातील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी एमएमआरडीएने गंजाड ते कवडास व सुर्यानगर दरम्यान 33 के.व्ही. ट्रान्समिशन लाइनच्या देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सी नियुक्त केली आहे जेणेकरून या कालावधीत अखंडित वीज पुरवठा राखता येईल. 

"प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी योग्यती काळजी घेण्याच्या सूचना प्रकल्पप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना सुरक्षेच्या उपायांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.  प्रकल्प स्थळावरील बॅरिकेडिंगची योग्य मांडणी आणि देखभाल करणे, प्रकल्प स्थळालगतच्या रस्त्यांवरी माती आणि सुटे भाग साफ करणे, पाण्याच्या योग्य निचरा करण्यासाठी पुरेशा क्षमतेचे डिवॉटरिंग पंप उपलब्ध करणे, आपत्कालिन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे, अशा सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत इतर संस्थांना गरज भासल्यास तातडीची मदत पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मान्सूनमध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पुर्ण तयारी केली आहे.” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी सांगितले. 

आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सेवा ०१ जून २०२४ पासून सुरू होणार असून पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

दूरध्वनी क्रमांक -०२२- २६५९१२४१, ०२२-२६५९४१६३,
भ्रमणध्वनी क्रमांक -८६५७४०२०९० आणि
टोल फ्री क्रमांक - १८००२२८८०१(समाप्त).

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget