Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार
कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले.
मुंबई : कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. ते म्हणाले की, नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. बांधकाम कामगार ,ऑटो रिक्षाचालकांच्या नोंदी आहे
वडेट्टीवार म्हणाले की, अद्याप केंद्राने पैसे दिले नाहीत. आजची गरज आहे. आमच्या खात्याला 1600 कोटी अपेक्षित आहेत ते आले नाहीत.
ऑक्सिजनसंदर्भात ते म्हणाले की, तामिळनाडू 52 टँकर निघाले आहेत. ते पोहोचत आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्राला विनंती केली आहे. आता दिले तर इतक्या लांबचे ऑक्सिजन दिले. रस्त्याने 10 दिवस लागले असते, असं ते म्हणाले. दुःख आहे की बेड मिळू शकत नाहीत. मात्र आम्ही प्रयत्न करतो आहोत, रात्री दोन अडीच वाजेपर्यंत काम करतोय, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, कुंभ मेळ्यातून येणारे लोक 60-70 टक्के तिकडे बाधित झालेत. आता तेथील लोक राज्यात येतील तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे. अशा बाहेरून आलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करायची, असं ते म्हणाले.