एक्स्प्लोर
मुंबईकरांना खुशखबर, ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त ठरला!
म्हाडाच्या नव्या घरांच्या किंमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एका आनंदाची बातमी आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण एक हजार घरांसाठी ही जाहिरत असेल.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर, साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरे असतील, अशी माहिती मिळते आहे.
म्हाडाच्या या नव्या घरांच्या किंमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरु आहे.
कुठे-कुठे घरं असतील?
बोरीवलीतील महावीरनगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अॅण्टॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द या ठिकाणी यंदा म्हाडाची घरे उपलब्ध असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement