एक्स्प्लोर
मराठी भाषा दिन | 'मराठी'साठी परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम, प्रत्येक बसस्थानक रांगोळीने सजणार
ज्येष्ठ कवी , कुसुमाग्रज ( वि.वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिन (27 फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात परिवहन विभागाने देखील अनोखा उपक्रम राबवला आहे.
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकांवर 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संपूर्ण बसस्थानक आणि बसस्थानक परिसर स्वच्छ, सुशोभित करून आकर्षकरित्या रांगोळी काढण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकांमध्ये कवी सुरेश भट यांनी लिहलेले आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले "लाभले आम्हास भाग्य..." हे मराठी अभिमान गीत प्रवाशांना दिवसभर ऐकविण्यात येणार आहे.
सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले पाहिजे, केवळ शासन स्तरावर 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा न होता, तो जनसामान्यांपर्यंत पोहचवावा, यासाठी महाराष्ट्राची 'लोकवाहिनी' असलेली एसटी खऱ्या अर्थाने योग्य माध्यम आहे. त्यामुळे गेली चार वर्षे एसटी महामंडळातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमांतून 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे, असंही परब यांनी सांगितलं.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व बसस्थाकावर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आगार व विभाग कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ मराठी पत्रकार यांचे वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना शुभेच्छा दिल्या जातील. बसस्थानकाच्या ध्वनिक्षेपकावरून दिवसभर सातत्याने रज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा प्रसारित करण्यात येणार आहेत.
मराठी भाषा दिनानिमित्त बस स्थानकं आवर रांगोळ्यांनी सजणार असल्यानं प्रवाशांना देखील साहजिकच स्वच्छता, टापटीप बघायला मिळेल अशी अपेक्षा प्रवाशी वर्गाने व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement