एक्स्प्लोर
शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार; राज्य सरकारच्या हालचाली सुरू
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी ठाकरे सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी याबद्दल माहिती दिलीय.
मुंबई : राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार असून त्यासाठी सरकार हालचाली सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलंय.
देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार केलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर बैठकीत विस्तृत चर्चा झाली. ते म्हणाले, कायदा तयार करताना त्यातील तरतुदींचे पालन करणे सर्व शाळांना सुलभ झाले पाहिजे. फिरतीची नोकरी असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर वरच्या वर्गात मराठी विषय घेणे अवघड होईल, तेव्हा त्यांना यातून सूट मिळावी यासाठीची तरतूदही त्यात असावी. मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज असल्याची भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात 'मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन' या विषयावरील वार्तालापात सुभाष देसाई यांनी हे आश्वासन दिलं आहे. 'इयत्ता बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर, विधी व न्याय विभागाने अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या तरतुदी लक्षात घेऊन आपले अभिप्राय दिले आहेत', असे देसाई म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र -
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात 15 दिवसांपूर्वी दिल्लीत भाषाविषयक समितीपुढे सादरीकरण केले आहे. सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. मराठीला अभिजात दर्जा लवकरच मिळेल, अशी आशा असल्याचेही देसाई यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी पत्र लिहलं होतं. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा झाला पाहिजे, असं त्यांनी पत्रात लिहलं होतं. सोबतच पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करावा, अशी विनंतीही ढेरे यांनी पत्रातून केली होती.
Sanjay Raut | बेळगावातल्या मराठी भाषिकांना संजय राऊतांचा कोणता सल्ला | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement