एक्स्प्लोर

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर

मराठी भाषा अनिवार्य करण्याचं विधेयक विधानपरिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. 2020 -21 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने एक सक्तीचा विषय म्हणून सर्व शाळांमध्ये, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल अशी तरतूद या विधेयकात आहे

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भातलं विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. 'महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचं सक्तीचं अध्यापन आणि अध्ययन विधेयक-2020' आज विधानपरिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हे विधेयक मांडलं.

विधेयकातील तरतूदी

2020 -21 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने एक सक्तीचा विषय म्हणून सर्व शाळांमध्ये, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. 2020-21 पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी मराठी भाषा विषय सक्तीचा केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी पुढच्या इयत्तेसाठी लागू करण्यात येईल, शेवटी 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येईल.

या विधेयकानुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे. या कायद्यांच्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापकीय संचालकाला किंवा अन्य संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाहीत. तसेच मराठी भाषा बोलण्यावर निर्बंध आणणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाहीत, असंही या विधेयकात म्हटलं आहे.

विधेयक मंजूर होण्याआधी बोलताना माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं की, राज्यातील शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी सक्ती आहेच. आता दहावीपर्यंत मराठी सक्तीचं विधेयक मंजूर होतंय ही बाब स्वागतार्ह आहे. काही शिक्षण तज्ज्ञांचं मत होतं की आठवीपर्यंत मराठी सक्ती आणि नववी, दहावीला फ्रेंच, जर्मन भाषा शिकण्याची मुभा मिळावी. मात्र मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी एकमताने विधेयक पारित व्हावं, असं मलाही वाटतं, अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
Mumbai Air Quality Marathi News: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget