राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल, एबीपी माझाच्या बातमी वर शिक्कामोर्तब
राज्यात पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. या संदर्भात एबीपी माझाने बातमी दिली होती.
मुंबई : राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात एबीपी माझाने बातमी दिली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ठाणे, पुणे, नागपूर, मीरा भाईंदर आयुक्तांसह मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसेच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश दिले असल्याची माहिती आहे. गेल्या वेळी मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतही मुख्यमंत्री यांची चर्चा झाल्याचं कळतंय. या संदर्भात एबीपी माझाने अधिकाऱ्यांची नावे दिली होती. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
येत्या 24 तासात पोलीस विभागात मोठे फेरबदल, बड्या आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
पोलीस खात्यातील महत्वाचे बदल
- नवी मुंबई आयुक्त - बीपीन कुमार सिंह2) मीरा भाईंदर पोलिस आयुक्त - सदानंद दाते 3) पिपंरी चिंचवड - कृष्ण प्रकाश सिंह 4) ठाणे - विवेक फणसळकर (एक्सटेंशन) 5) पुणे - के वेंकटेशम (एक्सटेऱ्सन) 6) कायदा व सुव्यवस्था - विश्वास नांगरे पाटील 7) सह पोलिस आयुक्त गुन्हे, मुंबई - मिलिंद भारंबे 8) नाशिक पोलिस आयुक्त - दिपक पांडे 9) सह पोलिस आयुक्त प्रशासन, मुंबई पोलिस - राजकुमार व्हटकर 10) सह पोलिस आयुक्त ट्रैफीक, मुंबई - यशस्वी यादव 11) अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था - राजेंद्र सिंग 12) आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग - आशुतोष डुंबरे 13) पोलीस आयुक्त नागपूर शहर - अमितेश कुमार 14) अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - जय जित सिंग. 15) अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - विनय कुमार चौबे. 16) अपर पोलीस महासंचालक वाहतूक - भूषणकुमार उपाध्याय. 17) अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके - संजय कुमार. काही दिवसांपूर्वी मुंबईचे 10 डीसीपींची बदली केल्याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष झाला होता. असं म्हटलं जात होते की राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता डीसीपी बदल्यांची यादी जारी केली. ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्या बदल्या थांबवण्यात आल्या व 7 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नवीन यादी देण्यात आली. या वेळेस तसं काही होऊ नये म्हणून मुख्यमंत्री स्वत: या मोठ्या बदली यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.
Pravin Darekar | घरात बसणारे मुख्यमंत्री, प्रविण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका