एक्स्प्लोर
सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक : उदय सामंत
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. उद्या पुन्हा एकदा कुलगुरू-राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची बैठक होणार आहे.
मुंबई : विद्यापीठ अंतिम वर्ष परिक्षेसंदर्भात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल यांच्याशी भेट घेतली. मागील दोन ते तीन दिवसांपासून अंतिम वर्ष परिक्षेबाबत कुलुगुरूंच्या बैठकासंबंधी माहिती आज उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली. परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नेमकी काय तयारी केलेली आहे ? सोबतच परिक्षेबाबत विद्यार्थ्यांची काय भावना आहे, भूमिका आहे ? त्याबाबत सुद्धा राज्यपाल यांना माहिती दिली आहे. उद्या पुन्हा एकदा कुलगुरू-राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची बैठक होईल. आज झालेल्या बैठकीत परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याबाबत राज्यपाल यांनी अनुकूलता दर्शवली असल्याच उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
परिक्षांबाबत आज सुद्धा कुलुगुरूंच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहे. तीन टप्प्यात या बैठका घेतल्या जातायेत. एक बैठक सकाळी 11 वाजता झाल्यानंतर दुपारी 1 वाजता आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता कुलगुरूंची परत एकदा राज्य शासनसोबत आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सगळे कुलगुरू यांची राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उद्या दुपारी 4 वाजता होणार आहे. राज्यपाल कुलगुरू यांच्या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुद्धा उपस्थित राहतील.
पाहा व्हिडीओ : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मंत्री उदय सामंत यांची राज्यपालांशी चर्चा
या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्याचे ठरवलं जाऊन परीक्षा बाबत तारीख आणि परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. शिवाय, या बैठकीनंतर परीक्षा पुढे ढकलायाचे असल्यास राज्य शासन अर्जाद्वारे युजीसीला विनंती करेल. 'आज झालेल्या बैठकीत कुलगुरूंचे म्हणणे तुम्ही ऐकून घ्या, त्यांना जे आवश्यक आहे ते महाराष्ट्र शासन आणि कुलपती म्हणून मी करणार असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत' असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी माहिती दिली आहे.
याआधी झालेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी कुलगुरूचे म्हणणं समोर मांडताना परीक्षा या ऑक्टोबरमध्ये घेण्याचा विचार असून सोप्या पद्धतीने कशा घेतल्या जातील यावर विचार केल्याचा म्हटलं आहे. आता पुढील दोन दिवसात या बैठकांनंतर याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे सामंत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement