एक्स्प्लोर

बाजारात तुरी... मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत वाद

मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेत मंत्रिपदांवरुन वादावादीला सुरुवात झाली आहे.

मुंबई: ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ अशी परिस्थिती सध्या शिवसेनेची झाली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेत मंत्रिपदांवरुन वादावादीला सुरुवात झाली आहे. बरं शिवसेनेला जरी मंत्रिपदं मिळाली तरी आता केवळ 8-10 महिनेच निवडणुकीला राहिली आहेत. त्यामुळे पाच वर्षात जे झालं नाही त्यावरुन शेवटच्या काही महिन्यांसाठी शिवसेनेत वाद सुरु झाले आहेत. दसऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देऊ नका, या मागणीसाठी ग्रामीण भागातले आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेत विधानपरिषदेचे आमदार विरुद्ध विधानसभेचे आमदार असा वाद सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या आमदाराचं लक्ष आहे. मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद मिळावं, यासाठी काही आमदार उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. याआधीही विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिल्यानं ग्रामीण भागातले आमदार नाराज होते. सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्याने त्यांचं मंत्रिपद जाणार हे निश्चित आहे.  तर कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. संबंधित बातम्या 10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात   मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे 'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'   विस्तारात अनेकांना सुखद धक्का; शिंदेंचं प्रमोशन, जानकरांची स्वप्नपूर्ती

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget