एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरी जाऊन लिफाफा उघडा, भाजपचा गुपचूप सर्वे आमदारांना सोपवला, 40 टक्के आमदार धोक्यात
महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
मुंबई: दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचं धनी बनलेलं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने गुपचूप सर्व्हे करुन घेतल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या सर्वेत, भाजपचे राज्यातील 6 खासदार आणि जवळपास 50 आमदार धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त छापलं आहे.
महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
नुकत्याच झालेल्या या सर्वेत, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितलं होतं. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे विद्यमान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची कामगिरी खूपच निराशाजनक असल्याचं या सर्वेत म्हटलं आहे. त्यांना केवळ 19 टक्के पसंती मिळाल्याचं ‘फ्री प्रेस’च्या बातमीत म्हटलं आहे. मात्र भामरे यांनी ते नाकारत, आपल्याला 50 टक्के मतं मिळाल्याचा दावा केला.
सुभाष भामरे यांचा दावा
दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एबीपी माझाशी बोलताना, , केवळ कोणत्या तरी गॉसिपच्या आधारे माझं नाव त्यात घेणं चुकीचं आहे. माझा स्वत:चा सर्वे चांगला आहे. मला मिळालेल्या मतांची टक्केवारी खूप आहे, असं सांगितलं.
दुसरीकडे राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांचीही कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचं सर्वेत नमूद आहे.
नुकतीच भाजपच्या आमदार-खासदारांची बैठक मंगळवारी दादरमधील वसंत स्मृती या भाजप मुख्यालयात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
महत्त्वाचं म्हणजे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी शेवटी प्रत्येक आमदार-खासदारांना बंद लिफाप्यात त्या-त्या भागातील सर्वेचे निष्कर्ष सोपवले. घरी जाऊन लिफाफा उघडा आणि कार्ड बघा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना दिल्या. इतकंच नाही तर या सर्वेबद्दल मीडियासमोर अवाक्षरही काढू नका, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.
भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेत 40 टक्के आमदारांची चार वर्षातील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर उर्वरीत कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी 6 खासदांचं तिकीट 2019 मध्ये कापण्याची चिन्हं आहेत. यामध्ये रक्षा खडसे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.
जवळपास 60 टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement