एक्स्प्लोर
Advertisement
चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, 12 मुलं थोडक्यात बचावली
या लिफ्टमध्ये 12 मुलं होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौथ्या मजल्यावरुन कोसळलेली ही लिफ्ट जमिनीमध्ये तीन फूट घुसली.
ठाणे : चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये घडली. या लिफ्टमध्ये 12 मुलं होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंबरनाथच्या पश्चिम भागात नगरपालिकेच्या समोर जॉय हब नावाची इमारत आहे. या इमारतीत चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस असून मुलं तळमजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करतात.
या क्लासची 12 मुलं आज दुपारच्या सुमारास लिफ्टने चौथ्या मजल्यावर जायला निघाली, मात्र लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर दरवाजा उघडण्याऐवजी लिफ्ट प्रचंड वेगाने थेट तळमजल्यावर येऊन आदळली.
या वेगामुळे लिफ्ट जमिनीत तीन फूट खाली गेली. यावेळी मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर क्लास चालक आणि इतर लोकांनी धाव घेत लिफ्टचा दरवाजा तोडला आणि मुलांना बाहेर काढलं.
असाच प्रकार इथे यापूर्वी सुद्धा एकदा झाला होता, अशी माहिती रहिवाशांनी दिली. त्यावेळी बिल्डरला सांगूनही अजूनही या लिफ्टची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच बिल्डरला जाग येणार का? असा सवाल करत यावेळी बिल्डरविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement