एक्स्प्लोर
मुंबईत रहिवासी वस्तीत बिबट्याचा सर्रास वावर; नागरिक भीतीच्या छायेत
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागात वन्य जीवांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : मुंबईत सध्या रहिवासी वस्तीत वन्य जीवांचा वावर सर्रास होताना दिसत आहे. मुखतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीच्या आजूबाजूच्या परिसरात सध्या बिबट्याच्या सर्रास वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अश्याच प्रकारे रविवारी अंधेरी येथे एक बिबट्याच्या रहिवासी ठिकाणी वावर असल्याने नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
रविवारी रात्री आरे कॉलनीला लागूनच असलेल्या अंधेरी पूर्व येथील सिपज गेट क्रमांक एक जवळील पालिकेच्या वेरावली जलाशय सुरक्षा चौकीच्या आवारात जवळ एका बिबट्याने एका कुत्र्याला आपले भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला होता. ही झटापट एका सुरक्षा रक्षकाने पाहिली आणि त्याने आवाज केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला होता. त्या कुत्र्याचे प्राण वाचले आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु या घटनेमुळे येथील कर्मचारी आणि रहिवासी मात्र भीतीच्या छायेत आहेत. कारण हा बिबट्या आता वारंवार या ठिकाणी दिसू लागला आहे. विविध सीसीटीव्हीमध्ये त्याचा वावर कैद झाला आहे.
आरे कॉलनीला लागूनच असलेल्या या विभागात हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात नेहमी भटकत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्या ठिकाणी कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. तसेच वनाधिकाऱ्याची गस्तही वाढविण्यात आली असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरी देखील नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आव्हान वनाधिकारी करीत आहेत. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात अश्या प्रकारे बिबट्यांची दहशत वाढतच जात असून आता हा चिंतेचा विषय झाला आहे.
अंधेरीत बिबट्या जेरबंद
अंधेरी येथील मरोळ पोलीस वसाहतीजवळ असलेल्या वुड लँड इमारतीत शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. एक एप्रिल 2019 ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मरोळ परिसरात एक बिबट्या निर्दशनास आला होता. हा बिबट्या मनुष्यवस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बिबट्याचा वावर परिसरातील कॅमेऱ्यासुद्धा कैद झाला होता. मरोळ भागात मोठी मनुष्यवस्ती आहे. हा बिबट्या वुड लँड इमारतीच्या जिन्याखाली लपून बसलेला होता. अखेर घटनास्थळी वनाधिकारी आणि पोलीस दाखल झाले. त्यांच्या या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात आला.
हेही वाचा -
औरंगाबाद : अखेर सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
संदीप पाटील यांनी नॅशनल पार्कमधील बिबट्या दत्तक घेतला
CCTV | मुंबईत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत, बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement