एक्स्प्लोर

संदीप पाटील यांनी नॅशनल पार्कमधील बिबट्या दत्तक घेतला

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या दत्तक घेतला आहे. या बिबट्याचं नाव तारा असून ती वीस महिन्यांची मादी बिबट्या आहे.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी दत्तक घेतला आहे. या बिबट्याचं नाव तारा असून ती वीस महिन्यांची मादी बिबट्या आहे. संदीप पाटील आता वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. संदीप पाटील केवळ बिबट्या दत्तक घेऊन थांबले नाहीत. रेस्क्यू केलेल्या, अनाथ असलेल्या सर्व प्राण्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांसाठी येथील डॉक्टर दिवस-रात्र राबत असतात. त्यांच्या टीममध्ये संदीप पाटील देखील सहभागी होणार आहेत. जगातल्या प्रमुख शहरांमधील अभयारण्यांपैकी सांभाळण्यासाठी सर्वात अवघड असलेले अभयारण्य म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मात्र मुंबईकरांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुंबईकर या अभयारण्यात यावे आणि आपल्या परीने त्यांनी मदत करावी, यासाठी संदीप पाटील काम करणार आहेत. बिबट्या दत्तक घेणे आता नवीन राहिले नाही, मात्र संदीप पाटील हे एक पाऊल पुढे टाकून अभयारण्यातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार आहेत. त्यामुळे पर्यावरण जागृतीसोबत नवा आदर्शदेखील निर्माण होणार आहे. संदीप पाटील म्हणाले की, वानखेडेच्या हिरवळीवरुन संजय गांधी उद्यानाच्या घनदाट जंगलात येण्यासाठी शासनाने मला संधी दिली याचा मला खूप आनंद आहे. मला प्राणी आणि निसर्ग दोन्हीची खूप आवड आहे. येत्या काळात मी वनविभागाच्या संपूर्ण टीमसोबत काम करणार आहे. त्याबद्दल उत्सूक आहे. उद्यानातील प्राण्यांसाठी मुंबईतल्या उद्योगपतींनी, सेलिब्रिटींनी पुढाकार घ्यायला हवा. मदत करायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget