एक्स्प्लोर

तुम्ही कसले मुख्यमंत्री? मराठी भाषा भवन उभं राहिलं नाही पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मराठी भाषा भवन अजून उभं राहीलं नाही, पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय, कसले तुम्ही मुख्यमंत्री? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली

Uddhav Thackeray : मराठी भाषा भवन अजून उभं राहीलं नाही, पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय, कसले तुम्ही मुख्यमंत्री? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देशावर कोणताही घाला येवो, पहिला महाराष्ट्र धावून जातो. आज परत गरज आहे. संपूर्ण बंगाल ममता यांच्या मागे उभा राहतो. आम्हाला भाषेचा अभिमान जरुर आहे, हिंदुस्थान आमचा आहे असे ठाकरे म्हणाले. प्रत्येक राजाला राज्य मिळालं, भाषा मिळाली प्रत्येकाने सुखाने राहावं. घरावर मालकी सांगायला लागले मग सहन कसं करायच? भाजपची एक नीती आहे संस्कार मारुन टाकायचं असी टीका ठाकरेंनी केली. एक निशाण म्हणजे तिरंगा पाहिजे, भाजपचं फडक नको अशी टीका ठाकरेंनी केली. आता आम्हाला भीती वाटतेय की जनगणमन संपवून टाकतील की काय? असेही ठाकरे म्हणाले. 

आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिन असला पाहिजे

आज आपल्या मातृभाषेचा दिन आहे. आपल्यासाठी  रोजच मराठी भाषा दिन असलाच पाहिजे. आज अप्रतिम कार्यक्रम अनुभवलं जादूची पेटी. आपल्या आयुष्यात मतपेटी कायमच असते थापा ऐकत असतो पण आज ढोलकीवरची थाप ऐकली. शब्द आणि सूर यांच नातं आहे. पेटी माझ्यासाठी नवीन नाही. काका श्रीकांतजी घेऊन बसायचे अनेकजण घरी यायचे. कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत नम्र विनंती. पवारांचा मला राग येत नाही असेही उद्धव ठाकरे दिपक पवार यांच्याकडे पाहून म्हणाले.मराठी भाषेसाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो त्याचं मुख्यमंत्री क्रेडिट घेत आहेत. विलीन होणार विलीन होणार असं म्हणतायत पण खरच होणार का? असा सवाल ठाकरेंनी केला. 

मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली

मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली. काल पुन्हा ते बोलले त्यांची सवय आहे की जुनं दळण पुन्हा दळायचं. अहवाल केला तर दिला तो स्वीकारला पण लागू करायच्या अगोदर गुवाहाटीला गेल्याचा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. पेटीवर कितीतरी हिंदी गाणी ऐकली. ती गाणी मोठी केली कोणी? मंगेशकर घराणं, या गाण्यांना लोकप्रियता महाराष्ट्राने मिळवून दिली ना? यांना सगळे पक्ष नकोत म्हणून शिवसेना संपवून टाकायची आहे. शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणसांची हालत काय झाली असती असे प्रश्न आपल्याला विचारतात. अजूनही आम्ही आमचा नेता सोडलेला नाही. नेता बदलला नाही. अदला बदल करणारे आम्ही नाही असे ठाकरे म्हणाले. 

भाजप मराठी माणसांसाठी किती रस्त्यावर उतरली हे सांगावं

आम्ही मराठी माणसांठी काय केलं हे आम्ही सांगतो, भाजप मराठी माणसांसाठी किती रस्त्यावर उतरली हे त्यांनी सांगावं. मनाचे श्लोक रोज कोणी वाचले तर कोण भाजपात जाणार नाही एवढी ताकद त्यात आहे.मराठी श्लोकाचे हिंदीकरण करून संपूर्ण देशात वाटले पाहिजे. कोणीही येतोय आणि हनुमान चालीसा शिकवतोय. आजपासून ज्ञानेश्वरी द्यायची मोदी आले तरी ज्ञानेश्वरी द्यायची. आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली त्यांचे अभिनंदन करतो. मुख्यमंत्री असताना त्यांना अटक करता. पुरावे नसताना अटक करता? आता त्या अधिकाऱ्यांना अटक करा टाका तुरुंगात असे ठाकरे म्हणाले.  

 ईव्हीएमची जादू वापरुन कसला विजय मिळवता

मी सभागृहात बोललो अजित पवार यांच्यावर एवढे आरोप केले की एखादा दुसरा असता तर जीव दिला असता, आधी चिक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि बाजूला बसिंग. संजय राऊत यांच्यावर पण आरोप केले पण  समोरचा पुन्हा उघडा झाला. जर लढायचं असेल तर लढ ना मैदानात. ईव्हीएमची जादू वापरुन कसला विजय मिळवता ती त्यांची जादूची पेटी आहे. मुंबईत मराठी माणसाने ताकद दाखवली. महापौर आपला बसला नाही पण पुन्हा बसणार नाही असंही नाही महाराष्ट्र देखील आपल्याकडे येईल. असशील शिथे तर जमतील भुते असं आहे. जोपर्यंत शिथे आहेत तोपर्यंत येत राहतील नंतर बघू काय होतंय ते असे ठाकरे म्हणाले. 

 

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget