एक्स्प्लोर
औरंगाबाद : अखेर सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
सिडकोतील एन वन परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला जेरबंद यश करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
औरंगाबाद : शहरातील सिडको भागात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे. सिडकोतील एन वन परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या आढळल्याने एकच खडबळ उडाली होती. काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात हा बिबट्या शिरला होता. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी उद्यानात बिबट्या फिरत असताना पाहिले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात फिरायला आलेल्या लोकांनी या बिबट्याला पाहताच आरडा-ओरडा करत परिसरातील नागरिकांना बोलावलं. बिबट्याला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, बिबट्याची माहिती कळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली. एका रिकाम्या घरात बिबट्या शिरल्यानं त्या घराला चोहु बाजूने संरक्षण जाळी लावण्यात आली होती. यावेळी वनविभागाची टीम आणि पोलिसांनी सर्व परिसरात खबरदारी म्हणून घरांचे दरवाजे बंद करुन घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
गार्डनच्या भागातून हा बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याने वनकर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. सिडकोतील एन वन हा भाग उच्चभ्रू समजला जातो. याच कॉलनीच्या पलिकडे डोंगराचा भाग असल्याने हा बिबट्या तिकडून आल्याची शक्यता आहे. दरम्यान, बघ्यांच्या गर्दीमुळं वनकर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अडथळा येत होता. औरंगाबाद शहरातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मानवी वस्त्यांमध्ये घुसून बिबट्यांनी हल्ले करण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून वाढल्या आहेत. कमी झालेल्या जंगलांमुळे बिबट्यांना निवारा आणि अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यांसह इतर प्राणीही मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. राज्यातील अनेक ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर यांच्यावर बिबट्यांनी केलेल्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता दाटवस्तीच्या शहरी भागतही बिबट्या खुलेआम शिरत आहे. मागील वर्षी नाशिकमध्ये शहरी भागत घुसून बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला होता. दरम्यान, औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच बिबट्या आढळला आहे.
संबंधित बातम्या :
चार कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, रितेश देशमुखचं स्पष्टीकरण
Chandrayaan 2 I भारतीय इंजिनिअरची नासाला मदत; विक्रम लँडरचे सापडले तुकडे
Lepord Spotted | औरंगाबादच्या एन-1 भागात बिबट्या आढळला | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
Advertisement