एक्स्प्लोर
फेसबुक फ्रेंण्ड रिक्वेस्टद्वारे महिलेची 35 हजारांना फसवणूक
ठाणे : फेसबुकच्या माध्यमातून ओळखीच्या व्यक्तींशी संपर्कात राहणं चांगलं असलं तरी अनोळखी व्यक्तीशी जुळलेले संबंध नेहमीच फायदेशीर ठरतील असं नाही. फेसबुकवर एका महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारणं खारेगावातील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. शर्मिष्ठा यांची तब्बल 35 हजारांना फसवणूक झाल्याची माहिती आहे.
मैत्रीचं नाटक करुन मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा, रालटे आणि एरिक मायकल या तिघांनी शर्मिष्ठा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्सलद्वारे गिफ्ट पाठवण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून तब्बल 35 हजार रुपये उकळले. आणखी 93 हजार रुपये लुटण्याच्या तयारीत असताना, वेळीच सावध झाल्याने कळवा पोलीस ठाण्यात शर्मिष्ठांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली.
कळव्यात राहणाऱ्या 45 वर्षीय श्रमिष्ठा यांना एरिक मायकल याने फेसबुक अकाउंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा आणि रालटे यांच्याशी संगनमत करुन एरिकच्या अकाउंटवरुन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. समोरची व्यक्ती उच्चशिक्षित महिला असल्याचं भासवल्यामुळे रिक्वेस्ट स्वीकारुन त्यांनी गप्पा सुरु केल्या.
फेसबुकनंतर व्हॉट्सअॅपवरही दोघींचं चॅटिंग सुरु झालं आणि हळूहळू त्यांचा विश्वास संपादन केला. तुम्हाला मोठ्या रकमेचे 45 किलोग्रॅम वजनाचे गिफ्ट पार्सल पाठवत असल्याची त्या महिलेचा मित्र एरिकने बतावणी केली. त्यासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पार्सलच्या क्लिअरिंगसाठी 35 हजार डेव्हिड यांच्या दिल्ली येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले.
खात्यावर पैसे भरल्यानंतर पार्सल मिळेल, असे आमिष दाखवल्यामुळे त्यांनी ते भरले. हे पैसे भरल्यानंतर अॅण्टी टेररिस्ट सर्टिफिकेटसाठी 93 हजार रुपये भरावे लागणार असल्याचे रालटे याने सांगितले. मात्र शर्मिष्ठांना कोणतेही पार्सल न देता त्यांची फसवणूक केली. हे लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement