एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल

Kurla bus accident: कुर्ला बस अपघातावेळी नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडीओ व्हायरल. अपघाताच्यावेळी बसच्या आतील प्रवाशीही प्रचंड घाबरलेले होते.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेचा विषय ठरत असलेल्या कुर्ला बस अपघाताविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. काही जखमींना अपंगत्व आले आहे. अशातच कुर्ला बस अपघातावेळचा (Kurla Bus Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) हा अपघातानंतर बसमधून कशाप्रकारे बाहेर पडला, हे दिसत आहे.

कुर्ल्यातील एलबीएस रोडवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. इलेक्ट्रिक बस सात ते आठ वाहने आणि लोकांना चिरडत गेली. यावेळी बस प्रचंड वेगात होती आणि त्यामध्ये अनेक प्रवासी होती. इलेक्ट्रिक बसने वाहनांना धडका द्यायला सुरुवात केल्यानंतर बसच्या आतील प्रवाशीही प्रचंड घाबरले होते. बस भरधाव वेगाने वाहनांना धडका देत असताना आतील प्रवासी जीव मुठीत धरुन बसले होते. काही प्रवासी सीटला घट्ट धरुन शेवटपर्यंत बसून राहिले. तर उभ्या असलेल्या प्रवाशांनी हँडल्स आणि जो आधार मिळेल त्याला पकडले होते. प्रत्येक वाहनाला धडक दिल्यानंतर बसच्या आतमध्ये मोठे धक्के बसत होते. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरची प्रचंड भीती सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.

सगळे प्रवाशी बाहेर गेल्यानंतर बेस्टचालक संजय मोरे फुटलेल्या काचेतून बाहेर पडला

अनेक वाहनांना आणि लोकांना उडवत जाणारी ही इलेक्ट्रिक बस अखेर एका सोसायटीच्या इमारतीला येऊन धडकली आणि थांबली. त्यानंतर प्रवासी पटापट मिळेल त्या मार्गाने बाहेर पडले. बसचा कंडक्टर सिद्धार्थ मोरे हा मागच्या दाराने बाहेर पडला. तर संजय मोरे याने अपघाताच्या धक्क्यातून सावरत आपल्या दोन बॅग उचलल्या आणि बसच्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर उडी टाकली. संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे बसच्या बाहेर पडल्यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली. मात्र, पोलिसांनी आणि एका नागरिकाने या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवल्यामुळे त्यांचा जीव वाचला. 

या अपघातासाठी नेमके कोण कारणीभूत आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बेस्ट प्रशासन आणि आरटीओकडून इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तर संजय मोरेने आपल्याला ही बस चालवण्यासाठी केवळ एक दिवस प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. मी गेल्या 30 वर्षांपासून वाहन चालवत आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. काहीतरी  झाले आणि बसवरील माझे नियंत्रण सुटले, असा दावा संजय मोरेकडून सातत्याने केला जात आहे. 

आणखी वाचा

संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं

बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Mumbai Metro: धारावीखालून वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मार्ग, मुंबई मेट्रो 11 वर पाच नवी स्थानकं होणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तर
धारावीखालून वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मार्ग, मुंबई मेट्रो 11 वर पाच नवी स्थानकं होणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget