(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
कंगनाने सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. शिवसेने तर तिच्याविरोधात जोडेमारो आंदोलनही केलं होतं. वेगवेगळ्या स्तरांवरून कंगनाने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. अशातच कंगनाने एक ट्वीटकरून तिच्या मुंबईवरून चाललेल्या गदारोळाची दखल घेतली होती. ती म्हणाली की, 'अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.'
आज 9 सप्टेंबर कंगना रनौतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. अशातच कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे.
आज सकाळी कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'
कंगनाचं ट्वीट :
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी????
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.
यात विधानाचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी हिंदी कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.
भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यामुळे मात्र आता प्रकरण चिघळणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव
विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने 2016 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. आता सभापती यावर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.
..तर कंगनाची चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
कंगना ड्रग्स घेते असे आरोप शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचीही चौकशी आम्ही करणार आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं. तसंच महाराष्ट्र पोलिसांचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र कुठल्या एका पक्षाचा नाही. तो भाजपचा सुद्धा आहे, भाजपनेही अशा व्यक्तींचा निषेध नोंदवायला हवा, असंही गृहमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
- 'विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
- कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा कंगाना काय अधिकार? निवृत्त पोलिसाची कोर्टात याचिका
- पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत
- मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये, मनसेचा कंगनाला इशारा
- 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...
- कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप