कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप
अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केल्याने तिच्याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगणाने ट्विटवरुन केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा कंगनाचा आरोप “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
कंगना झाशीची राणी... राम कदम कंगनाने मुंबईत का येऊ नये? महाराष्ट्र सरकारला कशाची भीती वाटते. जर ती स्वतः पुढे बॉलीवूड मधील ड्रग माफिया, राजकारणी, अभिनेता यांची नावे सांगण्याचं घाडस कंगना दाखवत आहे. याविषयी कंगनाचे कौतुक न करता कंगनाला धमकावण्याचे प्रयत्न केले जात आहे. वास्तवात महाराष्ट्र सरकार कंगनाला घाबरत आहे. कारण तिने नाव सांगितली तर सर्वांची नावे देशासमोर येतील. त्यामुळे तिला धमकावलं जात आहे. मात्र, राज्य सरकार हे विसरत आहे की संपूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे. कंगना झाशीची राणी आहे, ती अशा धमक्यांना घाबरणार नाही.
Strongly condemn this ridiculous comparison of Mumbai -city which has been giving shelter & hope to crores of ppl - with POK. & this #BJP MLA instead of condemning compares the ungrateful lady with Jhansi ki Rani. इन दोनों की करतूतों को जिस थालीमें खाना उसीमें छेद करना कहते हैं। https://t.co/SEhwRLLijH
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 3, 2020
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका कंगना रणौत आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे. "ज्या मुंबईने राहयला घर, खायला अन्न दिलं त्याची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करणाऱ्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा स्त्रीचा निषेध करण्याऐवजी तिची तुलना भाजप आमदार झाशीच्या राणीशी करत आहेत."
निवडक ट्वीट
As an outsider, an independent working woman & resident of #Mumbai for the past decade. Just want to say that Bombay is one of easiest & safest cities to live & work in. Thank you @MumbaiPolice @CPMumbaiPolice for your relentless efforts & service to keep #AamchiMumbai safe. ????????????????
— Swara Bhasker (@ReallySwara) September 3, 2020
मुंबई हिंदुस्तान है।
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 3, 2020
May what may come #mumbaimerijaan
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020
मुंबई मेरी जान ❤️
Retweet with a ‘❤️’ if you feel the same!#MumbaiMeriJaan — Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) September 3, 2020