कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्यासंदर्भात 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. मुंबई महापालिकेने या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'कंगनाचं ऑफिस महापालिकेला देण्यात आलेल्या नकाशाप्रमाणे नाही.' कंगनाने राहत्या घराचं रूपांतर ऑफिसमध्ये केलं आहे. त्यामुळे बीएमसीचं म्हणणं आहे की, कंगनाने अवैध्यरित्या ऑफिस बांधलं असून तिने नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे 24 तासांत स्पष्टीकरण आणि ऑफिसचं बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियम 354 अ अंतर्गत कंगना रनौतला ही नोटीस पाठवली आहे.
मुंबई महापालिकेने नोटिसमध्ये लिहिलं आहे की, कंगना रनौतचं हे ऑफिस मुंबई महानगरपालिकेच्या नियम 354 अ नुसार नाही. तसेच हे अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाका नाही तर पालिका हे बांधकाम तोडणार, असंही या नोटीसमधून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, नियम 354 अ च्या मापदंडानुसार, त्या ठिकाणी घर किंवा बिल्डिंगचं बांधका करणं अवैध्य ठरवण्यात येतं. तरीही बांधकाम केल्यास ते महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जातं. त्यावेळी बीएमसी त्या बांधकामावर कारवाई करू शकते.
पाहा व्हिडीओ : कंगनाच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेची नोटीस
काय आहे कंगना रानवतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम
1. ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिनमध्ये रूपांतरीत केले आहे.
2. स्टोअर रूमचा किचन रूममध्ये रूपांतर
3. ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट
4. तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5. देवघर आणि लिव्हिंग रूममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन
6. पहिल्या मजल्यावर अनधिकृत टॉयलेट
7. समोरील बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8. दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना तयार केला आहे.
9. दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी बांधण्यात आली आहे.
नोटीससोबत घराचा फोटो
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या ऑफिसच्या गेटवर ही नोटीस लावली असून त्या नोटीसमध्ये घराचा एक फोटोही आहे. तसेच नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, घरातील कोणता भाग पालिकेकडे दाखल केलेल्या कागपत्रांनुसार नाही. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतानाच, मुंबई पालिकेने केलेल्या कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना रनौत
कंगना रनोट आणि तिने मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य जोरदार चर्चेत असतानाच आता कंगनाने आणखी एक स्फोटक वक्तव्य ट्विटरवरुन केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंगनाने एक ट्वीट करून तिच्या मुंबईवरून चाललेल्या गदारोळाची दखल घेतली होती. ती म्हणाली होती की, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
- कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा कंगाना काय अधिकार? निवृत्त पोलिसाची कोर्टात याचिका
- पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत
- मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना रणौत
- मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये, मनसेचा कंगनाला इशारा
- 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...
- कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप