'विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली असल्याच्या वक्तव्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. अशातच आता या वादात आता अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे.
!['विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला Amruta Fadnavis Says turns out to be more Naughty than what we thought targets Sanjay Raut on Remarks for Kangana Ranaut 'विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/08170657/web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी 'हरामखोर' हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी 'अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल', असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं', असं संजय राऊत म्हणाले होते.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली असल्याच्या वक्तव्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. अशातच आता या वादात आता अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत.' तसेच अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट करताना #Naughty हा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच त्यांनी हे ट्वीट करताना राऊतांचं नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला आहे. याआधीही कंगनाच्या समर्थनार्थ बोलताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडो मारो आंदलनावरही टिका केली होती.
पाहा व्हिडीओ : 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला
कंगनाच्या मुंबई विरोधातील वक्तव्यानंतर कंगनावर टिकेची झोड उठली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी कंगनाची बाजू घेतली होती. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रनौतला पाठिंबा दर्शवला होता.
काय आहे प्रकरण?
कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.
याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.
भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा कंगाना काय अधिकार? निवृत्त पोलिसाची कोर्टात याचिका
- पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत
- मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना रणौत
- मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये, मनसेचा कंगनाला इशारा
- 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...
- कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)