एक्स्प्लोर
Advertisement
‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो’
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मात्र, सकाळपासूनच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. कर्जमाफी असो वा भाजपने शिवसेनेची समजूत काढणं असो, वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
‘आले रे आले... हात हलवत आले... दिल्लीवरुन आले... हात हलवत आले...’ असे म्हणत विरोधकांनी दिल्लीहून जाऊन आलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा निषेध केला, तर ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो’, असे म्हणत कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
विरोधकांच्या हटके घोषणा :
“आले रे आले… हात हलवत आले… दिल्लीवरुन आले... हात हलवत आले...” “मल्ल्या के दलालों को... जुते मारो सालों को... जिओ के दलालों... जुते मारो सालों को...” “नागपूरचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो... दिल्लीचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो...”शिवसेनेचे मंत्री आल्यानंतर विरोधकांनी आपल्या घोषणा आणखी जोरात देण्यास सुरुवात केली आणि खास शिवसेनेला उद्देशून विरोधकांनी घोषणा दिल्या. पर्यावरण मंत्री रामदास कदम आल्यानंतर विरोधक म्हणाले,
“काढले काढले... यड्यात काढले!!!” “वाघांची शेळी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो !!” “दिल्लीला सहलीवर गेलेल्या सरकारचा धिक्कार असो..!!”एकंदरीत विरोधक आज अर्थसंकल्पादरम्यान आक्रमक पवित्रा घेताना दिसतील, हेच यावरुन लक्षात येतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement