एक्स्प्लोर

विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधकांची मागणी

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवताना सरकारने केवळ अवघ्या नऊ दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. हा कालावधी विरोधी पक्षांना मान्य नाही.

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवताना सरकारने केवळ अवघ्या नऊ दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. हा कालावधी विरोधी पक्षांना मान्य नाही. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळावा अशी मागणी केली.

यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र सरकारने अवघ्या नऊ दिवसांचे कामकाज निश्चित करुन अधिवेशन संपवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी घेऊन दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.

राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणाऱ्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आदींचा समावेश होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
Embed widget