मुंबईत यंदा संसर्गजन्य आजारांमध्ये घट, लेप्टोची भीती कायम
मुंबईत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांमध्ये घट झालेली दिसून येते आहे. मात्र यंदा लेप्टोस्पायरोसिसमुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारी आहे.

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांमध्ये घट झालेली दिसून येते आहे. मात्र यंदा लेप्टोस्पायरोसिसमुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारी आहे. या महिन्यातील आकडेवारीनुसार लेप्टोच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले नसले तरीही या आजाराने मंबईत आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियामुळे वरळीत एका सफाई कामगाराचा, तर डेंग्यूमुळे कुर्ल्यात एकाचा आणि लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कॉलराचेही 3 रुग्ण आढळून आले आहेत.साथीचे आजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधित उपाययोजनामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. यावर्षी मुंबईतील पाचशे घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1870 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
लेप्टोसाठी 450 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी लेप्टोचे 11 संशयित रुग्ण आढळले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सात जणांना लेप्टोची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लेप्टोमुळे खासगी व सार्वजनिक रुग्णांलयामध्ये झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या पालिकेने अद्याप जाहीर केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
