एक्स्प्लोर
मुंबईमध्ये हंता व्हायरसची साथ, एका मुलाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत डेंग्यू पाठोपाठ हंता व्हायरसची साथ पसरली आहे. या आजारामुळे कुलाब्यातील १२ वर्षांच्या एका मुलाचा हंता व्हायरसमुळे नुकताच मृत्यू झाला आहे.
या रुग्णामध्ये डेंग्यूसदृश लक्षणे दिसून येत होती. परंतु रक्ताची चाचणी केली असता, त्याच्या शरीरात हंता हा दुर्मिळ विषाणू आढळून आला. मुंबईत 2006 व 2010 मध्ये हंता व्हायरसचे विषाणू आढळून आले होते. कुत्रे, उंदिर-घुशी यांच्या मलमूत्रातून हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो, असे डॉक्टरांनी म्हणणं आहे.
हंता व्हायरचा आजार अतिशय दुर्मिळ आहे. अफ्रिका, कंबोडिया व दक्षिण पूर्व आशियातील काही देशांमध्ये या आजाराचे विषाणू आढळतात. हा विषाणू संपूर्ण शरीरावर हल्ला करतो. त्यामुळे फुप्फुसात रक्तस्त्रावही होतो.
हंता व्हायरसची लक्षणे
- हंता व्हायरसची लक्षणे दोन महिन्यांच्या आत दिसण्यास सुरुवात होते.
- थकवा येणे, ताप येणे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
- याशिवाय डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, अतिसार, आणि ओटीपोटात दुखणे आदी लक्षणेही दिसून येतात.
- या आजारात रुग्णाला खोकला आणि श्वासनास त्रास होऊ लागतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
