एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ‘हाईट बॅरिअर्स’ दोन दिवसात तुटले!
रायगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या ‘हाईट बॅरिअर्स’ निकामी ठरले असल्याचे दिसून आले आहे. 15 पैकी 8 ‘हाईट बॅरिअर्स’ हे वाहनांची शिस्त न पळणाऱ्या वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे तुटले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अवजड आणि मल्टीएक्सेल वाहनांना लेनची शिस्त लागावी यासाठी 22 जून रोजी ‘हाईट बॅरिअर्स’ बसवण्यात आले होते. यामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोलजवळच्या तीन किलोमीटरच्या टप्प्यात 15 ‘हाईट बॅरिअर्स’ बसवण्यात आले होते. यामुळे बोरघाट परिसरात अवजड वाहने आणि मल्टिएक्सेल उंच वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्याचा प्रयत्न महामार्ग वाहतूक पोलीस आणि आयआरबीमार्फत करण्यात आला होता. परंतु अवघ्या दोनच दिवसात या हाईट बॅरिअर्सच्या संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे.
यातील अनेक बॅरीअर्स हे बेशिस्त वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे तुटलेले आढळून आले आहेत. यामध्ये काही बॅरिअर्सचे कोपरे तुटले आहेत, तर काही बॅरिअर्स हे अर्धे तुटले असून अनेक बॅरिअर्सचे मुख्य आडवे पोलच तुटून गेले आहेत.
खालापूर टोलपासून 3 किलोमीटरच्या टप्प्यात लावण्यात आलेल्या 15 पैकी 8 हाईट बॅरिअर्स हे तुटलेले आढळून आले आहेत.
दरम्यान, महामार्ग वाहतूक विभागामार्फत अवजड आणि उंच वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरु असताना आजही अनेक वाहने ही उजव्या बाजूच्या पहिल्या फास्ट लेनवरूनच गाड्या चालवीत असल्याचा खंत वाहनचालक करीत आहेत. यामुळे हाईट बॅरिअर्सच्या या प्रायोगिक प्रयत्नानंतर यावर काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement